मी तर आता हे सगळे shows बघणे बंद केले आहे त्यामुळे डोके शांत आहे. AS तर रसातळाला पोचली आहे. काही न बोललेलेच बरे. अशोक मामा म्हटले तसे स्टोरी संपली तरी दळण दळणे का चालू आहे तेच कळत नाही. mnb गटार झालीय. chyd मध्ये अजूनसुद्धा तेच तेच तंबाखू दारू उंची आणि रंग याच्यावरचेच शाळकरी मुलांच्या लेव्हलचे जोक्स, आता disgusting वाटायला लागलेत.
बहुतेक घरात रात्री काहीतरी लावायचे म्हणून हे चॅनेल्स चालू असतात आणि त्यालाच हे trp समजत असावेत. नवीन सेरिअलचे प्रोमोज पण खूपच खालच्या दर्जाचे दिसत आहेत. हे ऑडियन्सचे systematic dumbing down चालू आहे म्हणजे लोकांना पुढे चांगले आणि वाईट यातला फरक कळणार नाही आणि ते वाईटच समाधान मानतील आणि cvs ना काही efforts घ्यावे लागणार नाहीत.
मी game of thrones आणि young pope बघून काढले, आता the witcher सुरु केले आहे. अगदीच बोर झाले तर जुन्या सिरिअल्स आहेतच. अगदी small वंडर सुद्धा डाउनलोड केले आहे, अजूनसुद्धा तितकेच हसू येते. entertainment che options आहेत, आणि आपला वेळ त्याहूनही मौल्यवान. त्यामुळे आता मनाला आवडेल आणि बुद्धीला पटेल तेच बघावे.
782