या सिरियलमध्ये व्हॉयलेन्स जरा अतीच ,दाखवला जात आहे,अस नाही वाटत.
अगदी पहिल्या एपिसोडपासून.
कालच्या भागात गरम चहा सर्टिफिकेट वर सांडू नये म्हणून ती मानसी किती सहनशील आहे हे दाखवताना त्या पडणार्या चहाखाली आपला हात धरते.अरे किती ती फालतू क्रिएटिव्हिटी. कोणाच्या डोक्यात येत आहे.
सर्टिफिकेट वर चहा सांडू नये म्हणून तेच बाजूला घ्यायच किंवा हातात धरायच.
ITV शोज फालतू असतातच पण ITV प्रेक्षक यांना काय फालतू वाटले का,अरे एवढ तर एखाद लहान मुल पण करेल.
ती गायत्री तर कहर दाखवली आहे.सासर्यांना औषध काय देत नाही,खोकत असूनही फरशी काय बसवायला सांगते.
कॉलेजमध्ये हे प्रकार रँगिंगमध्ये चालतात.पण त्यावर पण आता बंदी आहे.इथेतर सर्रास दाखवतात.
आणि तो मेल लीड एवढा शिकलेला असतो हे कालच कळल.
मग एवढे घरात प्रॉब्लेम्स असताना शिक्षणाचा उपयोग करून पैसे कमवण्याची साधी अक्कल याला नसेल तर हा मुळात मेन लीड कसा?
लॉजिकल सिरियल पण चालू शकते यावर चँनेलवाल्यांचा विश्वासच नाही का?
या सिरियलला टीआरपी मिळून जर ही वरचढ ठरली तर मग स्टार प्रवाह ही अनेक वर्ष टॉपलाच राहिल.
पण नाही मिळाला तर प्रेक्षकांच खरच कौतुक कराव लागेल.
Edited by RPRRR42 - 5 months ago
comment:
p_commentcount