Originally posted by: iluvusakshi
त्याला कारण ही तसंच आहे.
पूर्वीचे कलाकार हे 'जोशी', कुलकर्णी, बर्वे, दामले, तळवलकर, भावे, केळकर , मोने, देव असे होते.
प्रामुख्याने पुणे येथील होते. त्यामुळेच उच्चार आणि भाषा ही by default शुध्द आणि स्पष्ट होती.
हल्ली मात्र नगर, नाशिक, बीड, इथले लेखक, कलाकार आहेत.
तिथली बोली भाषा थोडी वेगळी आहे. गावरान पद्धत किंवा राकट, रासवट अशी आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, आजकालची तरुण कलाकार मंडळी ही बहुतांश english medium मध्ये शिकली असावी, म्हणूनही त्याचं मराठी स्वच्छ
नाहीये. किंवा घरीही फारसं मराठी बोलला जात नसेल.
किंवा बरेच लोक हिंदी मध्ये काम करतात, त्यामुळे त्यांना मराठी शब्द आठवतही नाहीत,
श्रेयस, रितेश, ही झाली काही उदाहरणे.
मात्र सई, हर्षदा, स्वप्नील, मांजरेकर, जाधव आणि थोड्या फार प्रमाणात कोठारे हे लोक मात्र मुद्दामून मराठी interview असला तरीही, इंग्लिश मध्ये बोलतात.
पण उमेश कामत, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, परचुरे, पोंक्षे यांचं सारखी मोजकी मंडळी मात्र मराठीतच बोलतात. अगदी हट्टाने. आणि ते ही शुद्ध आणि स्पष्ट.
1.2k