Originally posted by: mishkil88
good. Mukta what about you?
I'll join via Zoom or Teams.☺️
I eat all that swims in the ocean.😄
🏏IPL 2026: KKR vs LSG, 15th Match, Eden Gardens Kolkata🏏
🏏IPL 2026: RR vs RCB, 16th Match, BCS, Guwahati🏏
DISHA KI DIDI 9.4
Suzanne Bernert slams Deepika Padukone’s response
Anupamaa 09 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Trimurti Films Sues Aditya Dhar For Using Oye Oye In Dhurandhar
Vishal Bharadwaj Under Fire On Post Against Dhurandhar
Vridang spin-off separted from Kyunki main.
ABHEERA IN DANGER 10.4
Sandeep Reddy Vanga Praises Dhurandhar
Shaktimaan Mukesh Khanna Slams Samay Raina
Deepika Padukone Paid Less For Raaka
Originally posted by: mishkil88
good. Mukta what about you?
I'll join via Zoom or Teams.☺️
I eat all that swims in the ocean.😄
I only eat prawns , surmai,pomfret, ravas , bombil . So no idea about crabs 😊. May be ilu can tell the difference.Originally posted by: Arjunwagle
Some of us call crabs khekde while some chimbori😀
Can someone tell (@ mishkil )what's the difference? Or I think those from the plateau ( Pune ) refer crabs as chimbori ...while those from coastal refer to it as khekde 😀
सचिन पन्नाशीत
- द्वारकानाथ संझगिरी
सचिन तेंडुलकरने पन्नाशीत प्रवेश केला. काळ, "उसेन बोल्टच्या" वेगाने गेला असं वाटलं. डोळे मिटले की मला ती मुंबई विरुद्ध गुजराथ मॅच दिसते. सचिनचा पहिला रणजी सामना. वासू परांजपेंसोबत प्रेस बॉक्समध्ये मी बसलो होतो. वासूने एक कागद खिशातून काढला आणि सचिनच्या खेळीचा प्रत्येक बॉल, त्या बॉलला काय घडलं ते त्याने त्या कागदावर लिहलं. आणि शेवटी शतकानंतर सचिन बाद झाल्यावर त्याने तो कागद माझ्याकडे दिला. मी करंटा. तो ऐतिहासिक कागद मी कुठेतरी गहाळ केला.
नंतरच्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर न गेल्यामुळे खिन्न झालेल्या सचिनचा कोवळा चेहरा मला आठवतोय. त्याच्या काकूंच्या इंद्रवदन सोसायटीच्या चाळीतल्या एका खोलीत तो आणि अजित यांच्याबरोबर मी गप्पा मारत बसलो होतो. वासू परांजपेने त्यावेळी राजसिंगना विचारलं होतं की, ''का नाही त्याला वेस्टइंडिज दौऱ्यावर सिलेक्ट केलं?''
तेव्हा राजसिंग म्हणाले होते, ''उसे बॉल लगने का डर था हमें.''
त्यावर वासू परांजपे लगेच म्हणाला, ''अरे वो लगनेवाला बॅटसमन नही. वो लगानेवाला बॅटसमन है.''
अर्थात काळाने सर्वच बदललं. तो वानखेडे स्टेडियम, त्याचा प्रेस बॉक्स, त्याने कात टाकली. ती इंद्रवदनची चाळ पडली आणि तिकडे फ्लॅट्स उभे राहिले. आणि कोवळा, छोटा, बुटका, सचिन तेंडुलकर हा आभाळाएवढा उंच झाला. त्याकाळी क्रिकेटमधला छोटा ज्ञानेश्वर वाटणारा सचिन सर्व अपेक्षा पूर्ण करून क्रिकेटची ज्ञानेश्वरी लिहून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून समाधी घेऊन आता शांत आयुष्य जगतोय.
मागे वळून पाहताना मी विचार करतो, सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेटला आणि अर्थात सर्वसाधारण क्रिकेटला काय दिलं?
मी आकडेवारीच्या संदर्भात फारसं बोलणार नाहीये. अर्थात एक गोष्ट मला नमूद करायचीय की, तिथे त्याने अनेक शिखरं उभी केली. सर्वधिक आंतरराष्ट्रीय धावा, सर्वाधिक कसोटी शतकं, वनडेतली शतकं, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं वगैरे! विक्रम हे मोडण्यासाठी असतात. पण जो कुणी हे मोडेल, तो महान असेल पण तो सचिन तेंडुलकर असेल असं नाही. ते असणं आकडेवारीच्या पलीकडचं आहे.तो यायच्या आधी सुनील गावस्कर आणि सर डॉन ब्रॅडमन ही आमच्यासाठी फलंदाजीतली शिखरं होती. ब्रॅडमन हे आजही असं शिखर आहे की, काही बाबतीत ते जिंकणं अशक्यप्राय वाटतं. विशेषतः वैयक्तिक कसोटी सरासरीत.! जास्त कसोटी खेळल्यामुळे सुनीलने ब्रॅडमनने उभारलेली काही शिखरं पार केली. आणि स्वतःची नवीन शिखरं तयार केली. जेव्हा सचिन आला त्यावेळी अशी अपेक्षा होती की, निदान सचिनने सुनील गावस्करने उभारलेल्या शिखरांना स्पर्श करावा. सचिन सुनीलपेक्षा अधिक काळ खेळला. अधिक सामने खेळला आणि त्याने स्वतःची आणखीन उंच शिखरं तयार केली. ती शिखरं गाठणं इतरांना किती कठीण आहे, याची जाणीव आता पदोपदी होते. एक बॅड पॅच आला आणि आधी पांढऱ्या घोड्यावर बसलेला, राजपुत्रासारखा शिखराकडे घोडदौड करणाऱ्या विराट कोहलीचं काय झालं बघा. तो धावा आणि शतकांसाठी धडपडतोय. मोठ्या कारकिर्दीत सातत्य राखणं ही सोपी गोष्ट नसते. जी सचिनने करून दाखवली.
पण सचिनची महानता ही फक्त त्याच्या आकडेवारीची गुलाम नाहीये. त्यापलीकडे जाऊन त्याने बरंच काही केलं.
त्याने भारतीय फलंदाजीत आक्रमकता आणली. आणि अशा काळात ज्यावेळेला टीट्वेन्टीचा जन्मच झाला नव्हता. टीट्वेन्टीची आक्रमकता मला बऱ्याचदा कृत्रिम आक्रमकता वाटते. गोलंदाजांवर, क्षेत्ररचनेवर वेगवेगळी बंधनं टाकून घडवून आणलेली आक्रमकता. सचिनची आक्रमकता ही सर डॉन ब्रँडमन, सर गॅरी सोबर्स, डेनिस क्रॉम्प्टन, रोहन कन्हाय, व्हिव रिचर्ड्सच्या आक्रमकतेसारखीच नैसर्गिक आक्रमकता होती. सचिनपूर्वी भारतात आक्रमक फलंदाज नव्हते का? होते ना, माझ्या लहानपणी सी. के. नायडू आणि मुश्ताक अली यांच्या आक्रमकतेच्या कथा ऐकून मी वाढलोय. फारुख इंजिनिअर, पतौडी, वाडेकर, दुराणी, कपिल देव, संदीप पाटील वगैरेंच्या फलंदाजीतही आक्रमकतेचा आनंद मी घेतलाय. पण या सर्वांच्या आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप होता.
सचिनने आक्रमकता आणि सातत्य याचा अपूर्व संगम घडवून आणला. जो मी आधी जी नावं घेतली आहेत, त्या ब्रॅडमन, क्रॉम्प्टन किंवा विव्ह रिचर्ड्स सारख्या फलंदाजात पाहिला होता. आणि तिथून पुढे भारतीय क्रिकेटच्या फलंदाजांची वृत्तीच बदलली. एकेकाळी भारतीय फलंदाजांना "डल डॉग्स " म्हणून हिणवलं जायचं. आणि आज येणारा प्रत्येक भारतीय फलंदाज जणू आक्रमकतेचा वसाचं घेऊन येतो. मग तो लक्ष्मण असेल, युवराज असेल, सेहवाग असेल, विराट असेल, रोहित शर्मा असेल किंवा अगदी अलीकडचा पंत किंवा पृथ्वी शॉ असेल. ह्यात सचिनने त्यांना दिलेल्या स्वप्नाचा भाग,बदललेल्या क्रिकेट एव्हढाच मोठा आहे.
सचिन आला तेव्हा भारतात नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्यामुळे नवीन आर्थिक सुधारणा येत होत्या. त्याचे अनेक परिणाम झाले. खाजगीकरणामुळे घरोघरी टीव्ही आले. आणि क्रिकेट गावागावात गेलं. त्या टीव्हींमधून सचिन तेंडुलकर गावांमध्ये एक स्वप्न वाटत गेला. गावातल्या मुलांनाही सचिन होण्याचं स्वप्न पडलं.. क्रिकेट हा मोठ्या शहरातला खेळ छोट्या, छोट्या शहरात गेला. आणि आई बापानाही स्वप्न पडायला लागलं की, आपल्या पोटी सचिन तेंडुलकर जन्माला आलाय.. मुंबईतल्या अनेक आई बापांनी सात, आठ वर्षांच्या मुलांना घेऊन त्यावेळच्या प्रशिक्षकांकडे धाव घेतली होती. पण त्यातून पुन्हा नव्याने सचिन तेंडुलकर जन्माला आले का? नाही. ते होऊ शकत नाही. कारण शेवटी ही गुणवत्ता अशी देव प्रत्येकाला वाटत नाही. देवाला लहर आली त्याने एक साचा बनवला आणि तो तेंडुलकर कुटुंबाकडे अनपेक्षितपणे पाठवला. देव असे डिझायनर आयटेम एकदाच बनवतो. न्यूटन, ज्ञानेश्वर , शिवाजी महाराज, लता दीदी, महात्मा गांधी,मधुबाला, सोबर्स , सचिन वगैरे. नाहीतर त्या गुणवत्तेचं महत्त्वच कमी होईल. पण सचिनने एक गोष्ट पुढच्या पिढीला शिकवली की, आपलं धेय हे धावा काढणं आणि क्रिकेटमध्ये मोठ्यातमोठा पराक्रम गाजवणं हेच असलं पाहिजे. मग इतर सुख, येऊन बिलगत जातात. त्याच्या मागे धावावं लागत नाही. बरीचशी मंडळी इतर सुखांच्या मागे धावली, धावा विसरली आणि त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली . अलीकडच्या काळात ज्याला सचिनचं तत्त्व उमगलं त्याचं नाव विराट कोहली होतं त्याने सुरवातीचा चुकीचा मार्ग बदलला आणि तो बघता बघता मोठा झाला. ही गोष्ट पृथ्वी शॉ किंवा इतर खेळाडू यांनी समजून घ्यायला हवी. गुणवत्तेचा अपमान करून यश प्रसन्न होत नाही.
सचिनने नव्या पिढीला यश कसं पचवायचं ते शिकवलं. ही एक फार मोठी गोष्ट असते. महंमद अली, विव्ह रिचर्ड्स, मॅराडोना, मॅकॅनरो अशा महान खेळाडूंचा अहंकार त्यांच्या राहण्यातून त्यांच्या अंग प्रत्यंगातून, हालचालीतून जाणवायचा. सचिन त्यांच्याच पायरीवरचा खेळाडू पण अहंकाराचं प्रदर्शन त्याने कुठेच केलं नाही. तो अहंकार दिसायचा तो फक्त त्याच्या बॅट मधून. मला आठवतंय १९९० मध्ये सचिन आमच्या घरी, अजित या त्याच्या मोठया भावाबरोबर आला होता. तेव्हा त्याच्याकडे गाडी नव्हती. तो ११९० च्या इंग्लंडच्या दौऱ्यावर जायला निघाला होता. त्यांना टॅक्सी मिळवून देण्यासाठी मी नाक्यापर्यंत सोडायला गेलो. त्यानंतर सचिन बऱ्याचदा घरी आला. वेगवेगळ्या गाडीतून आला. अनेक शतकं, विक्रम त्यावेळेला त्याच्या खिशात कोंबलेली असायची. तो सुपरस्टार झाला होता. पण गाडीतून जमिनीवर उतरला की तो फक्त जमिनीवर चालायचा. सचिन घरी आला की आम्ही सर्वं मात्र आकाशातल्या ढगांवर आरूढ झालेलो असायचो. पण सचिन, अंजली जमिनीवर असायचे. इतरांचे महाल आणि आमच्या दोन खोल्या ह्यात त्यांनी कधी फरक केला नाही.एवढं यश, प्रसिद्धी मिळाल्यावर जमिनीवर पाय ठेवणं फार कठीण गोष्ट असते. फलंदाजीतल्या कठीण गोष्टी जेवढ्या सोप्या करून त्याने दाखवल्या तेवढंच जमिनीवर पाय ठेवणंही त्याला जमलं. खिशात ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, मतदानाचा हक्क नव्हता तेव्हा तो जगप्रसिद्ध झाला होता. वंडर बॉय झाला होता. हे वलय
अत्यंत निसरड् असतं .विशेषतः तरुण वयात. पण तो घसरला नाही. दोरीवर चालणाऱ्या सर्कशीतल्या कलाकाराप्रमाणे तोल सांभाळत चालत राहिला. म्हणून सचिन खेळायला आल्यानंतर, सचिनचं शतक झाल्यानंतर फील गुडची लाट अख्ख्या भारतभर पसरायची. त्याच्या शतकाचा आनंद हा परका नसायचा. तर तो आपलेपणाचा असायचा. सचिन हा भारतीय जनतेला परका कधी वाटलाच नाही. तो आपल्या कुटुंबातला वाटला. तो कोणाला मुलगा वाटला, कोणाला पुतण्या वाटला, कोणाला भाचा वाटला आणि कुणाला भाऊ.ती भावना आता किती खेळाडूं बद्दल वाटते? हेच मला वाटतं सचिनचं क्रिकेटमधलं मोठं यश होतं. त्याने जगापुढे आदर्श ठेवला. सचिनला देव करणारे पहिले होते ऑस्ट्रेलियन्स. ऑस्ट्रेलियन मंडळींनी त्याला पहिल्यांदा देवाची उपमा दिली. कारण ते इतके आक्रमक असत कि त्यांना एखादा माणूस इतका स्थितप्रज्ञ कसा राहू शकतो याचंच आश्चर्य वाटे. मला एकदा सचिननेच सांगितलेला किस्सा सांगतो, तो काहीतरी ३०, ४० वर बॅटींग करत होता कलकत्त्याला आणि मागे गिलख्रिस्ट उभा होता. लोकांचं सचिन, सचिन वगैरे सगळं सुरु होतं. . आणि गिलख्रिस्टने त्याला विचारलं, ''तू हे सगळं पचवतोस कसं?'' मी एकदा डेल स्टेनला विचारलं होतं की, ''तू सचिनला स्लेजिंग केलं आहेस का?''
तो म्हणाला, ''मी केलंय. पण मी नंतर थांबवलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्यावर स्लेजिंगचा काही परिणामच होत नाही. मग स्लेजिंग करून उगाच आपली एनर्जी कशाला फुकट घालवा.''
फार क्वचित प्रसंगी कधीतरी सचिनने मैदानावर आपलं टेम्पर घालवलंय. अत्यंत अपवादात्मक वेळा, तो माणूस आहे हे केवळ दाखवण्यासाठी.म्हणून तो फक्त देशाचा नाही, संपूर्ण क्रिकेट खेळाचा आदर्श झाला.
आपल्या देशात नकळत का होईना राष्ट्रीय एकात्मता दोघांनी आणली. एक लतादीदी, दुसरा सचिन! माणसं महालात राहणारी असोत किंवा झोपडीत, कुठल्याही जाती धर्माची असोत, दोन आवाज त्यांच्या हृदयात घुमले. एक लतादीदींच्या गळ्यातून निघालेला, दुसरा सचिनच्या बॅट मधून आलेला.
त्या आवाजाने दुखाःवरच्या फुंकरीच काम केलं. कुणाला प्रेरणा दिली, कुणाला निखळ आनंद दिला.
एका लेखात मी पूर्वी म्हटलं होत.
वय काही गोष्टींना नसतं.
ते सचिनच्या बॅकफूट ड्राईव्ह ला
असणार नाही.
ते अर्जुनाच्या बाणा प्रमाणे सरळ जाणाऱ्या स्ट्रेटड्राईव्हला नाही.
ते आकाशात राहून जमिनीवर घट्ट पाय रोवण्याला नाही
मैदानाला मंदिर मानून त्याचं पावित्र्य जपण्याला नाही.
अशा त्याच्या अनेक गोष्टी चिरंजीव आहेत. त्याला वय
नाही.
वय त्याच्या शरीराला आहे. ते अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर आहे. शतकं ठोकण्याची त्याची सवय आहे.
त्याच्या १०१ व्या शतकाला टाळ्या मी स्वर्गातून मारणार आहे.
( माझा रविवार महाराष्ट्र टाइम्स मधील लेख )
Originally posted by: mishkil88
I only eat prawns , surmai,pomfret, ravas , bombil . So no idea about crabs 😊. May be ilu can tell the difference.
Kai pharak padto ...it's tastes the same whether you call it kekde or chimbori. 😊
Originally posted by: iluvusakshi
Happy happy happy birthday to my all time favorite...Sachin Tendulkar❤️
Long live the LEGEND.☺️
Here is his interview when he was 15-16 and was about to debut in test cricket.
https://twitter.com/FilmHistoryPic/status/1518220997102559232?t=83ZUltqdrLRwLc2b7uvKkw&s=19
Aaj MI la jinkaychi purepur sandhi aahe. 169 on board. Let's see. 38/0 in 6 overs.
72/4 off 12. Too bad.
Sony marathi var aajpasun serials madhe marathi subtitles chalu keli aahet. Good idea. Baki channels ni pan chalu karava mhanje tondatlya tondat kay putputtat te kalel. 😆
Csk ani MI...
दोघांचाही या वर्षी bad luck फारच खराब आहे..😆
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k