Geheraiyaan हा movie मला आवडला. सुरवातीला कंटाळवाणा वाटला तरी पुढे स्टोरी मधली कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात तसा तो पकड घेतो. काही काही ठिकाणी कथानकात अक्षम्य चुका , सततचे F- words, बोल्ड सीन्स हे ott वर नित्याचे झाले आहे ते इथेही आहे. दीपिका, सिद्धांत, अनन्या - या तिघांचीही कामे उत्तम झाली आहेत. भावनिक पातळीवर होणारी तीन मुख्य पात्रांची घालमेल चांगल्या प्रकारे दाखवण्यात लेखक, दिग्दर्शक, आणि ह्या तीन कलाकारांना चांगले जमले आहे. शेवटी काही गोष्टींचा अजून उलगडा व्हायला हवा होता. बाकी एकदा बघण्यासारखा आहे. Gully boy मधून उदयास आलेल्या सिद्धांत चतुर्वेदी ला नक्कीच चांगल्या ऑफर्स ह्यापुढे मिळतील.
133