मला वाटत की बिबॉसचा खरा गेम आता सुरू झाला आहे.सगळे आता आपापले कार्ड्स फेकत आहेत.
काल विशाल आणि मीनल खेळले ते परफेक्ट होत.त्यांना जितक शक्य आहे तितक सोनालीला वाचवायच आहे,आता जय कँप्टन झाल्याने तो नॉमिनेशनमधून बाहेर आहे,जर त्याला किंवा जर दादूस आज बाहेर पडले तर त्यांना काही सेव्ह करण्याची पॉवर दिली तर ते नक्कीच डॉक्टरला सेव्ह करणार.मग दोन्ही विक कंटेस्टंट टीम ए मध्ये राहणार.हा परफेक्ट गेम होता.
विकासला बहुतेक सोनाली नको आहे,म्हणून त्याचा आरडाओरडा चालला होता.
विकासला हे कळल आहे की आपण सिंपथीवरच पुढे जाऊ शकतो।जो तोही परफेक्ट करत आहे.
काल मीनलही तिचा गेम खेळली,वि2च्या भांडणात काहीही न बोलून.
जयने तर त्याचा गेम वेगळ्याच लेव्हलला नेला आहे.
उत्कर्षच मला शॉकिंग वाटत आहे की तो आता मागे मागे जात आहे.
गायत्रीला मी कधी कंटेस्टंट म्हणून धरल.नाही,पण बिबॉस वाचवेल तिला आणि फिनँलेच्या आधी काढेल.
मीरा ,तिला बिचारीला गेम कळून चुकला आहे,पण आता काहीही फारस करता येणार नाही,आता तिने स्वत:ला नॉमिनेशनमधून वाचवाव.,एवढच ती करू शकते आणि त्यासाठी तिला जय ,उत्कर्ष लागतील.
सोनालीलाही आता हे कळल आहे.की ती नॉमिनेशनमध्ये येणारच आहे पण अजून दोन आठवडेतरी ग्रुपसोबत राहव लागेल.
थोडक्यात काय तर प्रत्येकजण आता स्वत:चा गेम खेळणार,मग त्यासाठी तो एखाद दिवस वाईट ठरेल,एखाद दिवस चांगला ठरेल.
शत्रुशी मैत्री करेल,मित्राला शत्रु करेल,पण खरा गेम आता कुठे.चालू झाला
त्यामुळे आता टास्क बोअर होतील.पण माईंड गेम बघायला मजा येईल.
Edited by RPRRR42 - 4 years ago
966