सुहिता थत्ते यांच्या आई या पात्र विषयी थोडं...
त्यांचा जो त्रागा आहे तो एकदम बरोबर आहे.
आजही आपल्याकडे, मुलीचं लग्न हा जीवन मरणाचा/ प्रतिस्थेचा प्रश्न असतो ,आई वडील साठी.
आई साठी तर जरा जास्तच.
(नलू हे याचं उत्तम पण फारच भयंकर प्रतीक आहे)
म्हणजे कदाचित काही ठिकाणी या गोष्टीला ती मुलगी किंवा आई बाबा इतके महत्व देतही नसतील, जितके वेळा लोक त्यांना जाणीव करून देतात, की अहो तुमची मुलगी लग्नाची आहे/झालीये/ राहिलीये.
त्यामुळे त्यांचे जे dialgoues होते, की चांगली मुलं मिळत नाहीत किंवा त्या मीरा ला सांगतात ना की तू तुझ्या फुटपट्या(parameters.. सचिन देशपांडे च्या भाषेत) बाजूला ठेव..ते त्यांच्या दृष्टिने बरोबर आहे.
म्हणूनच मी काल पोस्ट केली तेव्हा म्हटलंय,की, जो तो आपापल्या दृष्टीकोनातून योग्य आहे आपापल्या जागी.
या सिरीयल ची सर्वात मोठी ताकत याचे dialogues आहेत.
पहिल्या episode मधे पल्लवी आणि मुक्ता चे, दुसऱ्या मध्ये मुक्ता आणि मुग्धा चे आणि काल सचिन ने जे मीरा ला सांगितलं किंवा प्रोमो मध्ये तिच्या आईने तिला जे सांगितलं ते..
Keep it up मुग्धा गोडबोले.👍
We simply love ur writing.👌
वास्तववादी असतात यांचे संवाद.👍
771