या सिरीयल चा प्रयोजन काय आहे ?
मुळातच ही सिरीयल काय म्हणून बनवली आहे?
जाड मुलगी आणि बारीक मुलगा यांचि लव्ह स्टोरी दाखवायची होती का?
की श्रीमंत मुलगा आणि (अति)गरीब(थोडक्यात भिकार्डे, दळभद्री) मुलगी यांची प्रेमकहाणी दाखवायची होती याना?
बरं, सगळे scenes तर इथुन तिथून चोरलेले आहेत.
मग यांची creativity कुठेय??
बरं मग, अनविता ला काय म्हणून घेतलीय? म्हणजे ती जाडी आहे हा एकच criteria आहे का?
कारण ती ढिम्म आहे, तिच्या चेहऱ्यावर ची माशीही उडत नाही आणि एक रेशही हलत नाही.
आणि या उलट shalv भयंकर नाटकी आहे.
अनविता पेक्षा नक्कीच शतपटीने ती मनू बरी आहे. (PNMT वाली).ती पण नाविनच आहे, ती पण healthy आहे, अगदीच काही ती चवळीची शेंग नाहीये. पण निदान ती अभिनय तर हिच्यापेक्षा बराच बरा करते.
मग का? का म्हणून ही सिरीयल आमच्या डोक्यावर मारलीये zm ने?
8 आणि 8.30 pm दोन्ही स्लोट्स भयंकर torturous आहेत.
तिकडे ती शेम्बडी शुभरा. जरा काही झालं की हिचे झाले नळ सुरू, ती अक्षरशः प्रत्येक scene मध्ये रडत असते. प्रत्येक.
Edited by iluvusakshi - 4 years ago