कैच्या कै दाखवायला लागले हे लोक.मांडलेकरचा लेखणीवरचा हात सैल पडला की चँनेलने पाडायला लावला.
पण इथे त्या स्वीटूच्या सिरियलमध्ये एका महिन्यात प्रेम दाखवल म्हणून आम्ही ओरडत आहोत,तर या सिरियलमध्ये तर नुसत्या दोन तीन भेटींवर तो आस्ताद म्हणजे संग्राम एवढी ओळख नसताना,बर ती त्याच्यावर विश्वासही ठेवायला तयार नसताना तिला तिच घर मिळवून देण्यासाठी,त्या टेंभेवाड्यात काय जातो,घर विकत घ्यायची तयारी काय दाखवतो.
अरे मांडलेकरा,भाड्याच घर नावाचा एक प्रकार असतो म्हणजे मुंबईत तरी असतो,पुण्यात नसावा बहुतेक😆
तस भाड्याच घर घेऊन दे ना.डिपॉझिट आणि भाड स्वाती देईल ,कमावते ती.
सगळ फिल्मी😡
आणि तिकडे काळेची तर वेगळीच कथा.आता कसतरी घुसडतील काळेला परत स्वातीच्या आयुष्यात.
त्यापेक्षा सरळ कुमले आहे तसच्या तस दाखवायच.
बर,त्या ढोमेला नारळ दिला का.
791