Originally posted by: iluvusakshi
Zee marathi च्या serials च हेच एकमेव वैशिष्ट्य आहे की यांचे title song छान असतात(rather असायचे).
Melodious एकदम.
Soothing.
मला तर ऊन पाऊस, अवघाची संसार, अवंतिका, एक धागा सुखाचा, सारेगमप यांचे title song हे सगळे खूप खूप आवडतात.
मला आभाळमायाचे लिरिकस फारच आवडले अगोदर ऐकलं होत पण विशेष लक्ष दिल नव्हतं 😆
झी मराठीच्या मालिकांचा दर्जा पण कमी झालाय 😈आणि शीर्षक गीतांचा पण 🤡
जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया...
आभाळमाया...
1.2k