Originally posted by: iluvusakshi
अजून एक ..
serials बघणं हे खरंच खूप stressful आणि torturous झालंय.
मी दोन, तीन घरीच असल्याने माझी आई ज्या ज्या serials बघते, त्या मलाही बघव्या लागल्या...(of course नाईलाजाने... choice/ option च नव्हता काही).
झी च्या रेशीमगाठी मध्ये आज अख्या episode फक्त एक lift बंद पाडणे या एका scene वर काढला.
YKTMN मध्ये स्वीटू आणि ओम च romance आज दाखवला..(जो की मी म्हटलं तर बघितला, म्हटलं तर नाही बघितलं..कारण मी मनू, मल्हार torture बघत होते).
Sun tv वर 'आभाळाची माया' नावाची एक सिरीयल आहे. त्यात आपल्या अरु च्या serial सारखा गेले 3 दिवस लग्नाची खरेदी, मानापमान, रुसवे फुगवे हेच दाखवण्यात गेले.
तिथेच 'सुंदरी' नावाची सिरीयल पण लागते.
त्यात तो आपला dr सुयश(माझा होशील ना वाला)..आहे..दोन दोन लग्न करतो. काही दिवस एकीकडे,काही दिवस दुसरीकडे.. असा तर ही सिरीयल कधीही संपणार नाही.
अश्या असंख्य serials आहेत, ज्याचं कथानक पुढे सरकतच नाही.
तुम्ही चार दिवस/ दोन आठवडे जरी नाही ना बघितलं ,तरी story तिथल्या तिथे असते.
137