या सिरियलचा एक महत्वाचा ड्रॉबँक हा आहे की जर प्रेग्नन्सी ट्रँकला अवाजवी महत्व दिल जात आहे तर मग आज जो काही क्लिनिकमध्ये काथ्याकुट चालू होता तो वर @मुक्ता ने सांगितल्याप्रमाणे आधी व्हायला हवा होता आणि त्याहीपेक्षा महत्वाच म्हणजे मनु आणि मल्हारने मिळून घालायला हवा होता.
ड्रॉबँक असा की मनु आणि मल्हार जणू काही पाळण्यातली बाळ आहेत आणि मीरा आणि आदिराजवरच सगळी जबाबदारी आहे.😆
मुळात यांना काय फार मोठा अनुभव आहे,ना लग्नाचा,ना संसाराचा,ना पालकत्वाचा
यांना स्वत:चच नात नाही टिकवता आल तर हेच उपदेश करत आहेत.😆
त्या होणार सून मधल्या श्री जान्हवी सारख आदि आणि मीराला गौतम बुध्दांसारख सर्वज्ञानी करणार बहुतेक.
मल्हार मध्ये काहीच अर्थ नाही पण ती मनु मला आता बिनडोकच वाटायला लागली आहे,मूल हवय,पण का ,कशाच्या भरवशावर?
सगळाच गोंधळ☺️
पण बहुधा निनावे बाई हा फोरम वाचत असाव्यात,कारण आपण सगळ्यांनी मिळून आजच्या काथ्याकुटीचा पिच्छा पुरवला होता
शेवटी ,झाली एकदाची काथ्याकुट.
वर कोणीतरी म्हणत आहे की मल्हार लग्नातून पळून जाईल
पण मला शंका येत आहे की मनुच मिसकँरेज पण दाखवू शकतात ,पुन्हा एकदा मल्हारच्या चुकीमुळे।
शंकेच कारण ,पुन्हा एकदा निनावे बाई.त्यांनी मनु मल्हारच्या स्टोरीतून आदि मीराला एकत्र आणायच ठरवलेल आहे ,आणि त्यांच्या स्टोरीत मीराने नात तोडलेल असत ,मग इथेही तसच काहीस दाखवून आदिमीराला आपल्या चुकीचा साक्षात्कार वगैरे दाखवू शकतात निनावे बाई.
@bold - you hit the nail girl!!
@red- I had mentioned the same earlier. And as you say Malhar chya chooki mule is likely how it might happen.
835