ही सिरीयल सुरू होऊन 3 weeks झाले.
पण स्टोरी म्हणावी तशी काही पुढे सरकत नाहीये. मुळातच हा मनू, मल्हार चा parallel track ची काहीच गरज नव्हती. उगीच खोगीरभरती केली आहे.
बरं आता याना घेतलंय, तर हा मल्हार इतका बालिश, irresponsible दाखवला आहे. आणि मनू पण तशीच.. आधी असा काही करताना कळलं नाही का की आपण जे करतोय ,त्याचे परिणाम किती गंभीर होतील पुढे म्हणून.
हा pregnancy ट्रॅक पूर्णपणे फसलाय यांचा.
यांनी लवकरात लवकर याचा निकाल लावला पाहिजे.
नाहीतर लोकांचा interest जाणार.
लोकं (म्हणजे आपण) मुक्ता आणि उमेश ला बघायला आलेत, या दोन माकडांना आणि त्या अश्विनी ला बघायला नाही आलेत.
जितक्या लवकर हा track संपेल, तितक्या लवकर आपल्याला (आणि लेखक, director ला सुद्धा) main track कडे वळता येइल.
आज मीरा बद्दल वाईट वाटलं की, बिचारीला माहीत आहे की मल्हार useless आहे, तरीही तिचे हात दगडा खाली असल्यामुळे ती बाबांकडे मल्हार ची रदबदली करत होती.
तिचा आणि आदी चा phone convo scene पण चांगला होता👌..तो migrane वाला.

878