Originally posted by: revatiraj
कंमेंटन्स वाचून बघण्याचा प्रयत्न केला, आणि हसावे कि चिडावे कळेना. जगातला कुठलाही श्रीमंत सेलिब्रिटी माणूस राजेसारखा असाह्य आणि बायल्या झाला नसेल. बघून दया येते. आणि शुभ्राने कमावती असून सुद्धा रॉक बॉटम गाठला आहे. मायलेकांच्या शिव्या खाणे हा तिचा मुख्य आहार आणि जीवनाचा एकमेव purpose दिसतोय. इतका अपमान होऊन सुद्धा शुभ्राक्का जागच्या हलल्या तर शपथ, हि तिथेच गाडल्यासारखी ठप्प. ती आणि हे घर फेविकॉलच्या ऍड मध्ये दाखवा, असे चिकटलेत कि निघण्याचे नाव नाही. आता फक्त डबड्याने तिला dog कॉलर लावायची बाकी आहे. पण तेही कदाचित तिला आवडेल. 😆
एवढी रडारड करण्यापेक्षा एक win-win सोलुशन आहे. बबड्याला ते रेस्टॉरंट द्या म्हणजे त्याला निवांत गेम्स खेळता येतील, राजेंना त्यांचे आवडते काम म्हणजे फरशी पुसणे आणि कूकिंग म्हंजे घरगड्याचे पैसे वाचतील, एक्सट्रा इनकम आणि टाईमपास म्हणून खेकसयला आणि बबड्याच्या गेम्स खेळून दुखलेल्या इवल्या हातांना लोणी लावायला शुभ्र आहे, तिचे रडके तोंड बघून आसा-गधड्याचे मनोरंजन पण होईल. त्या दोघांनी आधी खूप हाल सोसले, त्यामुळे त्यांनाही सुखात लोळत गिळता येईल आणि राजे शुभरला त्यांची सेवा करायचे भाग्य मिळेल. आणि या सगळ्यांना सुखी बघून आपण देखील खुश, मग यापेक्षा परफेक्ट शेवट कुठला असूच शकत नाही. 👏
🤣🤣🤣
1k