आजोबांची दया आली. तीर्थयात्रेला जाताना सगळे निरोप घेत होते, तेव्हा बबड्या पाय पसरून व्हिडिओ गेम खेळत होता. आजोबा त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत होते की तो प्रेमाने काही बोलेल; पण तेव्हा तो मठ्ठ त्याची नवीन इंटरेस्ट प्रज्ञाशी गप्पा मारीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होता. शेवटी निराश होऊन आजोबा निघून गेले खाली. आजोबा फार असहाय, दुःखी होते. फार वाईट वाटले ते एकटेच निघून गेले तेव्हा. असं वाटतं त्या डबड्याला चांगलं वाजवून काढावं. काही भावना वगैरे काही नाहीयेत त्या माठ माणसाकडे.
1k