ही लहान मुल चुकीच्या हातात पडली आहेत.एखादा सिनियर सिंगर किंवा संगीतकार असायला हवा होता.
काल शेवटच गाण गायलेल्या मुलीचा फक्त अमराठी पणा हायलाईट करायचा अट्टाहास का केला गेला.त्यासाठी अतिशय अवघड गाण पहिल्याच भागात तिला गायला लावल.खर सांगायच तर ते गाण तिला नाही झेपल.
यात त्या मुलीचा काहीही दोष नाही.मुळात सुन्या सुन्या हे गाण गाताना भल्या भल्या लोकांची तारांबळ उडते हे स्वत: सुरेश वाडकर यांनी सांगितल होत.
त्या बिचारीचा श्वास पुरत नव्हता.केवळ म्युझिशियन्सनी निभावल गाण.
तिच्या आवाजावर याचा परिणाम होणार नाही का.
ती आर्या म्हणाली तिची इंप्रोव्हायजेशन छान होती.त्याची आधी गरज होती का
ती श्वास न पुरल्यामुळे कितीतरी ठिकाणी बेसुर होत होती.
ती कार्तिकी काय रडली आणि हाईट म्हणजे तिला सांगते की बाळा,तू रडू नको.तू काय गाऊन गेलीस ,खर होत😆
ती काय गायली खरच तिला कळल नाही की आपण कोणाच ,कोणी लिहिलेल,काय अर्थाच.बिचारीला खरच कळल नाही.
ही गाणी गायचीच नाही,अस नाही.पण तसही तुम्ही एलिमिनेशन करणार नाही आहात. मग या मुलीला टँलें दाखवायला भरपूर एपिसोड्स मिळणार आहेत.
तिला जरा मुरू देत,मध्यावर अशी गाणी गायला द्या ना.
या लिटल चँम्प्सच्या वेळी सुध्दा स्वत: रोहित शेवटीशेवटी क्लासिकल बेस गाणी आणि प्रथमेश उडत्या चालीची गाणी गायली होती.
इथे तर बाहेर जाण्याचही टेन्शन नाही आहे.
निदान एका जजकडून अपेक्षा होती की सांगतील की प्रयत्न चांगला होता पण नाही.रडारड काय,नाटकीटणा काय
या मुलांच्या आईवडिलांनीच त्यांचे पाय जमिनीवर ठेवावेत.
comment:
p_commentcount